मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत - रवीकांत तुपकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

सातारा : इंग्रज लोक गोरे होते. त्यामुळे ते ओळखू येत होते. पण हे शेजारी बसले तरी ओळखू येत नाहीत. अन त्यांच्या मनात काय चालले हे समजत नाही. मोदी सरकारच्या काळात चांगले दिवस येतील असे वाटले होते. शेतकरीच काय सर्वच क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्षा रवीकांत तुपकर यांनी साताऱ्यात केले. 

येत्या सोमवारी (ता. 28) खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका टॉकीज ते साखर संकूलपर्यंत काढण्यात येणाऱ्याशेतकरी मोर्चाची माहिती तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी तुपकर यांनी फडणवीस आणि मोदी सरकाराच्या धोरणांविषयी टीका केली. 

तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना अद्याप तिजोरीची चावी सापडत नाही ही शोकांतिका आहे. सहकारी मंत्री सुभाष देशमुख, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे शेतकऱ्यांची अव्हेलना करीत आहेत. हे सरकार दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. आज ही राज्यातील विविध भागात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यामध्ये आता ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शेतकरी मरत असताना मोदी सरकारला राम मंदिरचा प्रश्‍न म्हत्वपुर्ण वाटत आहे. केवळ धर्मांत, जातीत, पोटजातीत भांडणे लावणे एवढेच काम यांचे सरकार करीत आहे. मोदींच्या काळात चांगले दिवस येईल असे वाटले होते. परंतु ते हिटलर ठरले. सर्व क्षेत्रात अस्वस्थता असल्याचे तुपकर यांनी नमूद केले.

Web Title: Tupkar criticizes Fadnavis and Modi government policies

संबंधित बातम्या

Saam TV Live