जवानाची गोळी झाडून आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 मार्च 2020

भुसावळ : भुसावळमध्ये एका जवानाने ड्युटीवर असताना वापरात असलेल्या रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या धक्कादायक घटनेमुळे मिलिट्री परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भुसावळ शहरातील आरपीडी पॉइंटवर घडली. 

भुसावळ : भुसावळमध्ये एका जवानाने ड्युटीवर असताना वापरात असलेल्या रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या धक्कादायक घटनेमुळे मिलिट्री परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भुसावळ शहरातील आरपीडी पॉइंटवर घडली. 

मृत जवानाचे नाव एपी नायक मंगेश जिनवर भगत (वय 28) असे आहे. शहरातील आरपीडी सैनिक केंद्रात आज सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत मेस वाटर पंप येथे कुंदरसिंग भवरसिंग राठोड नाईक यांची ड्युटी होती. सकाळी ड्युटीस आले. त्यांच्यासोबत ग्रेनीडीअर (शिपाई) आर. एम. भागराम, ग्रिनीडीअर के. किशोर, एपी नायक मंगेश जिनवर भगत नायक मंगेश भगत हे कामावर हजर होते. यावेळी मृत भगत यांनी मी ड्युटी करतो तुम्ही आराम करा, असे सहकाऱ्यांना सांगितले. नायक मंगेश भगत हे त्यांची रायफल घेऊन पहारा करीत होते. सहकारी गार्ड रुममध्ये बसले असताना रायफलमधून गोळी फायर झाल्याचा आवाज आला. सहकाऱ्यांनी धाव घेतली असता, नायक मंगेश भगत दरवाज्यासमोर खुर्चीसमोर खाली पडलेले आढळून आले. कपाळापासून वर डोक्‍यास जखम होवून रक्तस्त्राव झाला होता. राऊंड फायर झाल्याने खाली काडतुस व एक जिवंत राऊंड बाजूला पडलेली होती. सहकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. आत्महत्यचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही. या घटनेबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात कुंदरसिंग भवरसिंग राठोड यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार नागेश तायडे, अविनाश चौधरी तपास करीत आहेत. 

 

Web Title: marathi news solider's Suicide by gunfire


संबंधित बातम्या

Saam TV Live