"वडिल आईला मारताना बघू शकत नव्हतो...म्हणून कायमचा खेळचं संपवला"

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 मार्च 2020

शिवाजी परशराम जठार (वय 50, रा. नगरसूल) असे मृताचे नाव आहे. त्यांना दोन्ही पाय आणि दोन्ही हातांना गंभीर मार लागलेल्या अवस्थेत रविवारी (ता. 8) त्यांचा मुलगा समाधान याने नगरसूल रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी त्याने गावाजवळच अपघात झाल्याचे सांगितले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव धूम यांनी तपासून जठार यांना मृत घोषित केले. मात्र, दोन्ही पाय आणि हाताच्या जखमा पाहून डॉ. धूम यांना शंका आली. 

नाशिक/येवला : नगरसूल (ता. येवला) येथून अपघातात गंभीर जखमी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीतील पोलिसांना सतर्क केले. त्यानुसार पोलिसांनी जखमांची पाहणी केली असता, अपघात नसून घातपाताची शंका व्यक्त केली गेली अन्‌ खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली. विशेष म्हणजे संबंधित रुग्णासोबत आलेल्या त्यांच्या मुलानेच हा खून केल्याचे चौकशीत समोर आले. येवला पोलिसांना याबाबत कळविण्यात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा - आता सावकारी कर्जही माफ होणार

अपघाताचा केला होता बनाव; सिव्हिलमधील पोलिसांमुळे उकल 
शिवाजी परशराम जठार (वय 50, रा. नगरसूल) असे मृताचे नाव आहे. त्यांना दोन्ही पाय आणि दोन्ही हातांना गंभीर मार लागलेल्या अवस्थेत रविवारी (ता. 8) त्यांचा मुलगा समाधान याने नगरसूल रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी त्याने गावाजवळच अपघात झाल्याचे सांगितले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव धूम यांनी तपासून जठार यांना मृत घोषित केले. मात्र, दोन्ही पाय आणि हाताच्या जखमा पाहून डॉ. धूम यांना शंका आली. अपघाती मृत्यूची नोंद करण्यासाठी संशयित मुलगा समाधान जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत गेला. तेथे नाशिक तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार अजय नाईक, पंढरीनाथ तुंगार हे दोघे पंचनामा करण्यासाठी गेले असता, त्यांनाही संशय आला. त्यामुळे त्यांनी डॉ. धूम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही शंका व्यक्त केली. 

विश्‍वासात घेऊन चौकशी केली तेव्हा समजले...
त्यानंतर पोलिसांनी समाधानची कसून चौकशी केली. त्याने अपघात झाल्याचेच सांगितले; परंतु अपघात कसा झाला याचे काहीही उत्तर तो देत नव्हता. त्यामुळे संशय बळावल्याने समाधानला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. त्यानुसार पोलिस चौकीतून घटनेची माहिती तत्काळ येवला पोलिस ठाण्यात कळविण्यात आली. तेथील पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत संशयित समाधान जठार याला ताब्यात घेतले. 

आईला मारहाण केली म्हणून... 
मृत शिवाजी जठार यांनी रविवारी (ता. 8) सकाळी आठच्या सुमारास पत्नी शोभा यांच्याशी वाद झाल्याने मारहाण केली. त्याचा राग आल्याने समाधानने घरातील लोखंडी गजाने जन्मदात्या पित्याच्या दोन्ही पायांवर आणि दोन्ही हातांवर बेदम मारले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हात व पायांचे हाड फ्रॅक्‍चर झालेले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title Son Killed Father in Nashik


संबंधित बातम्या

Saam TV Live