आज शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट ठरणार निर्णायक?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोनिया गांधींची नवी दिल्लीत भेट घेणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबद्दल ते सोनियांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान काल संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. कमिटीच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोनिया गांधींची नवी दिल्लीत भेट घेणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबद्दल ते सोनियांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान काल संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. कमिटीच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. राज्यात सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी दिलीय. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या भेटीला अत्यंत महत्त्व आहे.

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप यांच्यात ताणाताणी झाल्यानंतर दोन आठवडे राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून, या पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. या वेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.

राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी आघाडी उदयास आली आहे. या अनुषंगाने कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून सभाषण झाल्याचे समजते.

सोनिया गांधी यांच्याशी ठाकरे यांची अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता उद्धव ठाकरे हे लवकरच नवी दिल्लीला जाणार असल्याचेही शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

Web Title: Sonia Gandhi and Sharad Pawar meeting in Delhi today


संबंधित बातम्या

Saam TV Live