IPL 2020 : आयपीएल होणारच पण शेकहॅंण्डवर बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि माजी विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्याद्वारे 29 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. आयपीएल ठरलेल्या कार्यक्रमानुसार होणार आहे, असे गांगुली यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : जगभरातील इतर खेळांच्या स्पर्धांवर "कोरोना'च्या भीतीचा परिणाम होत असला, काही स्पर्धा रद्द कराव्या किंवा पुढे ढकलाव्या लागत असल्या, तरी आयपीएलवर त्याचा परिणाम होणार नाही. ठरल्या कार्यक्रमानुसार ही स्पर्धा होणार आहे. 

खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व उपाययोजना करणार आहोत, असे आश्‍वासन बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि माजी विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्याद्वारे 29 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. आयपीएल ठरलेल्या कार्यक्रमानुसार होणार आहे, असे गांगुली यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा - साडी नेसून मिताली राज थेट खेळपट्टीवर; व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटच्या सामन्यांवर अजूनपर्यंत तरी कोरोनाचा परिणाम झालेला नाही. सर्वत्र क्रिकेटचे सामने सुरू आहेत. इंग्लंडचा संघ श्रीलंकेत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ लवकरच भारतात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेत खेळत आहे. त्यामुळे आयपीएलवर परिणाम होणार नाही, असे गांगुलींचे म्हणणे आहे.

आम्ही सर्वांची काळजी घेणार आहोत. वैद्यकीय टीम त्यासाठी तयारीला लागलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपाययोजना करणार आहोत. डॉक्‍टरांचाही सल्ला घेणार आहोत. आमच्या वैद्यकीय टीमने अगोदरच काही रुग्णालयांशीही संपर्क साधलेला आहे, अशी माहिती गांगुली यांनी दिली.

हे ही वाचा - बायकोसाठी कायपण! स्वत:ची मॅच सोडून निघाला तिच्या फायनलला

आत्तापर्यंत भारताच्या सीमेबाहेर असलेल्या कोरोनाच्या विषाणूने भारतात प्रवेश केला असून आत्तापर्यंत 30 जणांना त्याची लागण झाल्याची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत. यामध्ये आम्ही खेळाडू, फ्रॅंचाईजी, एअरलाइन्स, संघांचे निवास असलेली हॉटेल्स, ब्रॉडकास्ट क्‍रयू आणि संबंधित प्रत्येकाला जागरूक ठेवणार आहोत, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

हात मिळवू नका
सामन्याच्या किंवा सरावाच्या वेळी कोणी प्रेक्षक भेटत असतील तर कोणाशीही हात मिळवू नका किंवा त्यांनी विनंती केली, तरी त्यांचे मोबाईल हाताळून तुम्ही त्यांच्यासह सेल्फी काढू नका, असाही सल्ला सर्व आयपीएल खेळाडूंना बीसीसीआयकडून देण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title sourav ganguly confirms ipl 2020 despite growing coronavirus threat
 


संबंधित बातम्या

Saam TV Live