आज गांगुली स्वीकारणार "बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची सुत्रे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

मुंबई - तब्बल 33 महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्यांचे हक्काचे पदाधिकारी मिळणार आहेत. प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनाखाली उद्या बुधवारी "बीसीसीआय'ची सर्वसाधारण सभा होणार असून, यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्या नव्या कारकिर्दीलाही उद्यापासून सुरवात होणार आहे. त्याचवेळी 33 महिने "बीसीसीआय'चा कारभार पाहणाऱ्या प्रशासक समितीचा उद्या अखेरचा दिवस असेल. 

गांगुली उद्या "बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारतील. त्याचवेळी गुजरातचे जय शहा हे सचिव होती. या प्रमुख पदांसाठी या दोघांचेच अर्ज आल्याने उद्याच्या सर्वसाधारण सभेत होणाऱ्या निवडणूकीनंतर त्यांच्या घोषणेची औफचारिकताच बाकी आहे. 

पदाधिकाऱ्यांच्या अन्य जागांसाठी निवडणूक झाल्यावर "बीसीसीआय'ची नवी कार्यकारिणी आस्तित्वात येईल. यानंतर त्यांना 21 दिवसांत वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करावे लागेल. 

त्याचबरोबर सर्वसाधारण सभेमध्ये वर्षिक आर्थिक खर्चास मंजुरी दिली जाईल. प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले,""आमच्या 33 महिन्याच्या कालावधीत चार वेळा विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामुळे आमची सर्व माहिती आणि खर्चाचा आढाव तयार आहे. ती मंजूर करावी असा प्रस्ताव आम्ही नव्या कार्यकारिणीसमोर ठेवूू. आम्ही यापूर्वी ती तपासून घेतली आहेत. या सभेत आर्थिक व्यवहार मान्य व्हायलाच लागतील.'' 

या सर्वसाधारण सभेस क्रिकेटपटूंच्या उपस्थितीकडे लक्ष राहणार आहे. गांगुलीसह अझरुद्दिन आणि ब्रिजेश पटेल हे खेलाडू प्रथमच सर्वसाधारण सबेस उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्याविषयी कमालीचे आकर्षण असेल. 

महाराष्ट्राचा प्रवेश 
सर्वसाधारण सभेस 30 राज्य संघटनांच्या प्रतिनिधींना यापूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. या संघटना बैठकीस आणि निवडणूकीत सहभाग घेतील. त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकारी एन. गोपालस्वामी यांनी सेनादल, रेल्वे आणि विद्यापीठ प्रतिनिधींनी उत्तर प्रदेश आणि मणिपूरच्या ऐवजी बैठकीस उपस्थित राहण्याची मान्यता दिली आहे. प्रशासक समितीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला बैठकीस उपस्थित राहण्याची मंजूरी दिली असली, ते मतदान करू शकणार नाहीत. तमिळनाडू आणि हरियना संघटनेच्या प्रतिनिधींना मात्र या संपूर्ण कार्यपद्धतीपासून दूर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Sourav Ganguly to take over as a BCCI president today

संबंधित बातम्या

Saam TV Live