दक्षिण अंदमानात मॉन्सून दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 मे 2018

मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. 20 मेच्या आसपास मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. ती खरी ठरली आहे. ऊन्हाळ्याचा तडाखा वर्ष सरेल त्या प्रमाणे वाढतच आहे. या ऊन्हाळ्यात दोन-तीन वेळा पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी उष्णतेने प्रत्येकालाच हैराण करुन सोडले होते. पण लवकरच राज्यासह देशात इतरत्रही मॉन्सून दाखल होणार आहे.   

अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल, असा अंदाज होता. केरळात साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी मॉन्सून येतो. मात्र, हवामान विभागाने दोन ते तीन दिवस आधी म्हणजेच 29 मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. परंतु, यंदा वेळेवर हवामान तयार न झाल्यामुळे तो वेळेवर येईल का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारपणे 1.5 आणि 3.1 किलोमीटर उंचीवर आहे. मालदीव व कोमोरिन परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून 5.8 आणि 7.6 किलोमीटर उंचीवर असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल अशी शक्यता स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परीस्थिती सामान्य असेल.    
 
संबंधित बातम्या

Saam TV Live