महिला ठरवणार दक्षिण मुंबईचा खासदार.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

तृतीयपंथीही दूरच
तृतीयपंथी समाजही मतदानापासून लांबच राहिला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड पश्‍चिम विधानसभा क्षेत्रात 289 तृतीयपंथींची मतदार म्हणून नोंद आहे. त्यांच्यापैकी 163 तृतीयपंथींनी मतदान केले. वायव्य मुंबई मतदारसंघातील 18 पैकी एकाही तृतीयपंथी मतदाराने आपला लोकशाही अधिकार बजावला नाही.
 
मुंबई  : दक्षिण मुंबईचा खासदार महिलाच ठरवणार आहेत. पहिल्यांदाच महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मतदान केले आहे. मुंबईतील इतर पाच लोकसभा मतदारसंघांत मात्र महिलांचे मतदान नेहमीपेक्षा कमी होते. दक्षिण मुंबईत 51.33 टक्के पुरुषांनी आणि 51.58 टक्के महिलांनी मतदान केले. 

या लोकसभा मतदारसंघात 15 लाख 53 हजार 925 मतदार असून, त्यापैकी चार लाख 38 हजार 591 पुरुष आणि तीन लाख 61 हजार 16 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. कुलाबा विधानसभा क्षेत्रात 47.69 टक्के महिला आणि 43.34 टक्के पुरुषांनी मतदान केले. वरळीत 52.6 टक्के महिला आणि 51.93 टक्के पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात 52.76 टक्के महिला आणि 52.17 टक्के पुरुषांनी मतदान केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. काही महिला स्वकर्तृत्वावर नगरसेवकपद मिळवतात. इतर नगरसेविकांचे कामकाज त्यांच्या घरातील पुरुष मंडळीच सांभाळतात. मतदानातही महिलांची टक्केवारी कमी असते. या वर्षी काही ठिकाणी हे चित्र बदलल्याचे दिसत आहे.

तृतीयपंथीही दूरच
तृतीयपंथी समाजही मतदानापासून लांबच राहिला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड पश्‍चिम विधानसभा क्षेत्रात 289 तृतीयपंथींची मतदार म्हणून नोंद आहे. त्यांच्यापैकी 163 तृतीयपंथींनी मतदान केले. वायव्य मुंबई मतदारसंघातील 18 पैकी एकाही तृतीयपंथी मतदाराने आपला लोकशाही अधिकार बजावला नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live