15 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारची सुवर्ण रोखे योजनेला होणार सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पहिला टप्पा        15 ते 19 ऑक्टोबर    
दुसरा टप्पा          05 ते 19 नोव्हेंबर
तिसरा टप्पा         24 ते 28 डिसेंबर
चौथा टप्पा           14 ते 18 जानेवारी
पाचवा टप्पा         04 ते 08 फेब्रुवारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारची सुवर्ण रोखे योजना चालू महिन्यात 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नागरिकांना पुढीलवर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी 2019पर्यंत पाच टप्प्यांत सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. 

केंद्र सरकार हे सुवर्ण रोखे बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काही ठराविक टपाल कार्यालयांमध्ये किंवा शेअर बाजारातून विकत घेता येणार आहेत. सुवर्ण रोख्यांचे टप्पे पुढीलप्रमाणे असतील. 

पहिला टप्पा    15 ते 19 ऑक्टोबर    
दुसरा टप्पा       5 ते 19 नोव्हेंबर
तिसरा टप्पा      24 ते 28 डिसेंबर
चौथा टप्पा      14 ते 18 जानेवारी
पाचवा टप्पा      4 ते 8 फेब्रुवारी

सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने सुवर्ण रोखे बाजारात आणले आहेत. नोव्हेंबर 2015 पासून या योजनेस सुरुवात करण्यात आली.  सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून एका व्यक्तीला आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चार किलो सोने घेता येते. तर, विश्वस्त संस्थांना एका वर्षात 20 किलो सोने घेता येणार आहे. 

Web Title: Sovereign Gold Bond scheme to open from October 15


संबंधित बातम्या

Saam TV Live