धार्मिक चिथावणीखोर भाषणबाजी करणाऱ्या झाकीर नाईकला विशेष न्यायालयाची तंबी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

मुंबई : मुस्लीम युवकांना चिथावणीखोर भाषणबाजी करून भडकविल्याचा आरोप असलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक असलेल्या डॉक्टर झाकीर नाईकला येत्या 31 जुलैपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आज विशेष पीएमएलए न्यायालयाने आज दिले.

जर नाईक हजर झाला नाही तर त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा इशारा ही न्यायालयाने दिला आहे. 

धार्मिक चिथावणीखोर भाषणे करुन मुस्लीम तरुणांना भडकविणे, अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे असे आरोप ईडीने त्याच्यावर ठेवले आहेत. त्याची काही मालमत्ताही ईडीने सील केली आहे. तो भारताबाहेर असून हजर होत नाही म्हणून त्याच्याविरोधात वॉरंट बजावण्याची मागणी ईडीने केली आहे.

WebTitle : marathi news special court demands zakir naik to be present at court 

संबंधित बातम्या

Saam TV Live