VIDEO | सत्ताबाजाराच्या उलथापलथीत सट्टाबाजार तेजीत, उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

सट्टा म्हणजे एक प्रकारचा जुगार. मात्र, सट्टेबाजारातून देशातल्या अनेक घटनांची चाहूल लागलेली दिसते. आताही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सट्टेबाजार जोरात आहे. या सत्ताबाजाराचे पडसाद सट्टाबाजारात पहायला मिळतायत. फडणवीसांचा भाव पडला तर उद्धव ठाकरेंना पसंती जोरात असल्याचंही चित्र आहे. बहुसंख्यांचा सट्टा उद्धव ठाकरेंवर आहे. त्यामुळे नक्की सट्टाबाजाराचा अंदाज खरा ठरतो का हे येणारा काळंच सांगेल. मात्र नेमकं कसं आहे सट्टाबाजाराचं गणित पाहूयाच सविस्तर विश्लेषण...

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हा जवळपास अवघ्या महाराष्ट्राचा समज होता..स्वतः मुख्यमंत्र्यांनाही त्याबाबत आत्मविश्वास होता. मात्र, अचानक मोठ्या उलथापालथी झाल्या आणि शिवसेना महायुतीतून बाहेर पडली..आता तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिघे मिळून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत..त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा भाव एकदम कोलमडला आणि उद्धव ठाकरेंचा भाव वधारल्याचं सट्टाबाजारातल्या सूत्रांचं म्हणणंय. 

निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना 30 पैसे भाव होता तर शरद पवारांनाही 30 पैसेच भाव होता. अशोक चव्हाणांना दोन रुपये, असा भाव सट्टाबाजारात होता. मात्र, सत्तासमीकरणं बदलली आणि सट्ट्याचे फेव्हरिट मेंबर्सही बदलले. आता, उद्धव ठाकरेंच्या नावाला 65 पैसे, एकनाथ शिंदेंच्या नावाला दोन रुपये, आदित्य ठाकरेंच्या नावावर तब्बल 6 रुपये तर अशोक चव्हाणांच्या नावावरही सहा रुपये दर लागलेला कळतो. 

सट्टेबाजाराच्या नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीला सर्वाधिक पसंती असते त्याला सर्वांत कमी भाव असतो. उल्लेखनीय म्हणजे आता शिवसेना भाजपपासून दूर गेलीय. त्यामुळे महाशिवआघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत..मात्र, तरीही सरकार कोण स्थापन करणार, यावरही सट्टा लागलाय. त्यानुसार GFX IN महाशिवआघाडीला 65 पैसे तर भाजपसाठी 6 रुपयांचा भाव लागलाय, अशी माहिती आहे.

सट्टेबाजार म्हणजे जुगार. त्यामुळे त्याला किती गांभीर्यानं घ्यायचं..मात्र, राज्यातली सत्तासमीकरणं पाहता, कधीही उलथापालथ होऊ शकते, ही शक्यता नाकारला येत नाही.

Web Title  -  Speculative market choice uddhav thakarey as cm

संबंधित बातम्या

Saam TV Live