अतिवेगानं कार चालवताय.. हजार रुपये खिशात ठेवा!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाऱ्याशी स्पर्धा करीत कार चालवणाऱ्यांनो सावधान. ताशी 80 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं कार चालवण्याचा तुमचा बेत असेल तर खिशात एक हजार रुपये तयार ठेवा. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगानं गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू झालीय. आता महामार्ग पोलिसांनी स्पीड गन तैनात केल्यात, त्यानुसार ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगानं कार चालवल्यास दंड भरावा लागणार आहे. पोलिसांनी 30 वाहनचालकांवर कारवाई केलीय.

कारची क्षमता नसतानाही गाड्या अतिवेगानं पळवल्या जातात. बहुतांशवेळा  अतिवेगामुळं अपघातही होतात. एक्स्प्रेस वे वर अतिवेगानं गाड्या हाकणाऱ्यांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली. पण ती तात्पुरत्या स्वरूपात होती. आता या स्पीड गनच्या माध्यमातून एक्स्प्रेसवरचा प्रवास सुरक्षित होईल अशी अपेक्षा बाळगूयात.

WebTitle : marathi news speed guns on pune mumbai express way 

संबंधित बातम्या

Saam TV Live