भारत आता बायोफ्युएलचा वापर करून उड्डाण करणाऱ्यांच्या देशांच्या यादीत 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : भारताच्या मानपेचात आज आणखी एक तुरा रोवला गेला आहे. बायो फ्युएलचा वापर करून विमान भरारी घेणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ आता भारत देखील विराजमान झाला आहे. रविवारी डेहराडून ते दिल्ली या प्रवासादरम्यान 'स्पाइसजेट'च्या Bombardier Q400 या विमानाने बायोफ्युएल वापरून यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण आज प्रस्तावित होते. मात्र, एक दिवस अगोदरच ते आकाशात झेपावले. विशेष म्हणजे हे बायोइंधन 500 कुटुंबांनी मिळून तयार केले आहे.  

या उड्डाणासाठी 'कौन्सिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च' आणि डेहराडूनच्या 'इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम' यांनी संयुक्तपणे 400 किलो बायो जेट इंधन तयार केले. हे इंधन तयार करण्यासाठी व्हेजिटेबल ऑइल, साखर, प्राण्याची चरबी आणि जैवइंधन वापरण्यात आले आहे.  काल (रविवार) सकाळी 6.31 ते 6.53 च्या दरम्यान हे उड्डाण घेण्यात आले.

WebTitle : marathi news SpiceJet flew India's first biofuel-powered flight between Dehradun and Delhi

संबंधित बातम्या

Saam TV Live