श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नव्हता तर ती हत्याच होती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जुलै 2019

चतुरस्त्र अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली मृत्यूनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. बाथटबमध्ये पडून तिचा मृत्यू झाल्याचं त्यावेळी तपासयंत्रणांनी म्हटलं होतं. मात्र, श्रीदेवीच्या मृत्यूबाबत त्यानंतरही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.

त्या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नव्हता तर ती हत्याच होती, असा दावा करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीय. त्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. ख्यातनाम फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यानं त्यांनी हा दावा केलाय.

तपासात अशा अनेक गोष्टी समोर आल्यात की, त्या आधारे त्यांचा मृत्यू ही हत्याच होती, हे सिद्ध होतं, असा दावा त्यांनी केलाय. कोणतीही व्यक्ती दारूच्या नशेत छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू  शकत नाही, असंही ऋषिराज सिंह म्हणालेत. 

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीचा दुबईच्या एका हॉटेलात मृत्यू झाला होता. अतिमद्यपानामुळे ती तोल जाऊन बाथटबमध्ये पडली आणि नाकातोंडात पाणी गेल्यामुळे मृत्यू झाला, असं त्यावेळी जाहीर करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दुबई पोलिसांनीही श्रीदेवीच्या मृत्यूत काहीही काळंबेरं नसल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र, आता ऋषिराज सिंह यांचा हा दावा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार तर नव्हे ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.

WebTitle : marathi news srideve death Jail DGP raises questions on Sridevis death

संबंधित बातम्या

Saam TV Live