काश्मीरमधील 370 कलम हटवलं ; मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे सुरु असलेल्या वादावर करून दाखविले अशी चर्चा आहे. 

अमित शहा म्हणाले, की जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. कलम 370 काही कलम वगळण्यात येणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नवे नियम लागू होतील. देशाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी घोषणा आहे. घटनादुरुस्ती केल्यानंतर जम्मू काश्मीरसाठी नवीन कायदा लागू होईल.

काश्मीरमध्ये य़ुद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, लोकशाहीची हत्या करण्यात येत आहे, अशी टीका काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी केली आहे. अमित शहांच्या घोषणेनंतर राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळेल. या संदर्भात अमित शहा तीन विधेयके आणि एक ठराव संसदेत मांडण्यात येणार आहे.

काश्‍मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्यानंतर येथे चर्चांना उधाण आले होते. सरकार कलम 35 अ आणि कलम 370 रद्द करणार असून, त्यासाठीच ही तयारी सुरू असल्याची शंका काही विरोधकांनी व्यक्त केली होती. अमरनाथ आणि इतर धार्मिक यात्रांना आलेले यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी फिरण्यास सरकारने सांगितले आहे. अमरनाथ यात्रामार्गावर शस्त्रसाठा सापडल्याने लष्कर अधिक सावध झाले आहे.

Web Title: Article 370 will be scrapped, says Amit Shah in Rajya Sabha

संबंधित बातम्या

Saam TV Live