काश्मिरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सैन्यदलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मंगळवारी दोन दहशतवादी मारले गेले. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे. पोलिस सूत्रांकडून ही माहिती मिळाली. 

अनंतनाग जिल्ह्यातील वाघामा गावामध्ये ही चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सैन्यदलाचे एकूण तीन जवान जखमी झाले. त्यापैकी एक जवान उपचारांपूर्वी शहीद झाला. अन्य दोन जवानांवर सैन्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सैन्यदलाने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. पण त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. वाघामा गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर राष्ट्रीय रायफल्स, विशेष कृती दल यांनी संयुक्तपणे या ठिकाणी शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

Web Title : Two militants killed, a young martyr in an encounter in Kashmir
 
संबंधित बातम्या

Saam TV Live