दहावीचा निकाल जाहीर; यंदाही कोकण विभाग अव्वल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 जून 2018

यंदाचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. आणि दरवर्षीप्रमाणं यंदाही दहावीत मुलींनी बाजी मारली आहे. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केलाय. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली आहेत. कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला.

विभागीय निकालाची टक्केवारी 
पुणे 92.08% 
नागपूर 85.97% 
औरंगाबाद 88.81%
मुंबई 90.41% 
कोल्हापूर 93.88% 
अमरावती 86.49% 
नाशिक 87.42%
लातूर 86.30%
कोकण 96 %

संबंधित बातम्या

Saam TV Live