आज मध्यरात्रीपासून सामन्यांना न परवडणारी एसटीची 18 टक्के भाडेवाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

एसटी भाडेवाढ आजपासून करण्यात येणारे. आज मध्यरात्रीपासून 18 टक्के भाडेवाढ करण्यात येणारे. या दरवाढीमुळे एसटीचा पारंपरिक प्रवासी काही प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढ, सुट्या भागांचा वाढीव खर्च, कर्मचारी वेतनवाढ आदी कारणांमुळे एसटी महामंडळावर जादा भार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे.

महामंडळाने वाढता तोटा रोखण्यासाठी तिकीट दरवाढीचा कटू निर्णय घेतला आहे. त्याची अमलबजावणी गुरुवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातून महामंडळावर दरवर्षी सुमारे ४६० कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे. अशातच महामंडळाने कर्मचाऱ्यांची थकीत वेतनवाढ केली असून त्यातून महामंडळावर प्रत्येक वर्षी जवळपास १,२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

एकीकडे महागाईने त्रस्त झालेल्या सर्व सामन्याची आता एस टी दरात ही वाढ झाल्याने सर्व सामान्य जनेतून तिर्व नाराजी व्यक्त होत आहे. एसटीच्या दरामध्ये 18 टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र ही भाडे वाढ सर्व सामन्यांना परवडणारी नाही. अत्यंत गरजू लोक या लाल परीच प्रवास करतात. शासनाने ही भाडे वाढ करू नये अश्या प्रतिक्रिया सर्व सामान्य व्यक्त करतायत.

संबंधित बातम्या

Saam TV Live