कोरोनामुळे एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 मार्च 2020

पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एसटी बस व रेल्वे गाड्या रिकाम्या जात आहेत. यातून महामंडळाला तोटा होत आहे. असे असताना सुद्धा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तोट्यात महामंडळाचे फेऱ्या सुरू आहेत. आता एक एसटी बस मधून फक्त 22 लोकांना प्रवास करता येणार आहे.

मुंबई - "कोरोना"च संसर्ग थांबण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाययोजना करत आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता एसटीत प्रवास करताना एका सीटवर एकच प्रवासी बसून प्रवास करणार आहे, अशा सूचना प्रत्येक बस स्थानकावर प्रवासी आणि चालक-वाहकांना देण्यात आले आहे.

हे ही वाचा - VIDEO | कोरोनाशी लढण्यासाठी वधू-वरांचे हातही सरसावले

हा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकार दररोज वेगवेगळे निर्णय घेत आहेत. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एसटी बस व रेल्वे गाड्या रिकाम्या जात आहेत. यातून महामंडळाला तोटा होत आहे. असे असताना सुद्धा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तोट्यात महामंडळाचे फेऱ्या सुरू आहेत. आता एक एसटी बस मधून फक्त 22 लोकांना प्रवास करता येणार आहे.

हे ही वाचा - टुरिस्ट टॅक्सी ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या संख्येनुसार पुण्याकडे जाण्याच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. तर ज्या गाड्या सोडल्या जात आहेत, याची योग्य खबरदारी घेऊनच गाड्या मार्गस्थ केल्या जात आहेत. 

Web Title ST Bus Decision Of Regarding Corona


संबंधित बातम्या

Saam TV Live