ड्युटी अर्धवट सोडून गेलेल्या 40 चालक-वाहकांचे निलंबन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 जून 2018

सांगली : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले. लालपरी थांबली. प्रवाशांची गैरसोय झाली. अर्धवट ड्युटी सोडून गेलेल्या सांगली विभागातील 40 चालक-वाहकांना निलंबित करण्याचे आदेश एस. टी. महामंडळाने विभाग नियंत्रकांना सायंकाळी दिले. सांगली- आटपाडी एस.टी. बसवर कवलापूर-कुमठे फाटी दरम्यान दगडफेकीचाही प्रकार घडले. आरटीओ विभागाने खासगी प्रवाशी वाहतुकीतून प्रवाशी वाहतुकीस मुभा दिली. बसस्थानक परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 

सहाय्यक विभाग नियंत्रक अरुण वाघाटे म्हणाले,""सांगली विभागातील चालक-वाहक गुरुवारी रात्रीच्या मुक्काम एस.टी. बस घेऊन गेले. त्यांनी आज बस डेपोत आणली. मात्र आजच्या फेऱ्या केल्या नाहीत. अशा 40 वाहक-चालकांना निलंबित करण्याचे आदेश एस. टी. महामंडळाने उशिरा दिलेत. त्यांची नावे उद्या (ता. 9) सकाळी नोटीस फलकावर लावण्यात येतील. ज्यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी आहे, ज्यांच्या रजा आहेत. असे सोडून अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मात्र अद्याप लेखी आदेश नाहीत.'' 

"परिवहन मंत्र्यांनी जाहिर केलेली पगारवाढ फसवी आहे. सर्व कर्मचारी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. आता तरी सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलावीत.'' 
- विलास यादव,  एस. टी. कामगार नेते. 

जिल्ह्यावर एक दृष्टीक्षेप... 
प्रतिदिन एस. टी. फेऱ्या - सुमारे 1550 
चालक-वाहकांची संख्या - 4560 
शुक्रवारी दिवसभर झालेल्या फेऱ्या - केवळ 86 
कामावर हजर - केवळ 13 टक्के चालक-वाहक 
संपाची जबाबदारी - इंटक कर्मचारी संघटनेने घेतली 
उत्पन्न बुडाले - प्रतिदिनी 59 लाख (सांगली विभाग) 
नियमित सेवा - शिवशाही बस 

संबंधित बातम्या

Saam TV Live