एसटी थांबल्या ; प्रवाशांचे हाल सुरूच 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - एसटी कामगारांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. अघोषित संपामुळे राज्यातील 250 आगारांतून सुमारे 70 टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 80 टक्के आगारांतील कामकाज तर पूर्णत- बंद होते. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शुक्रवारच्या संपामुळे एसटीला सुमारे 15 कोटींचा फटका बसला आहे. आजही अनेक विभागात एसटी वाहतूक बंद असून, निलंबन केले तरी संप कायम ठेवण्याचे एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी महामंडळाकडे नऊ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा, असे आवाहन केले होते. हे अर्ज स्वीकारताना चित्रीकरण करण्यात येणार असल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खदखद आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संपाची हाक देत कर्मचाऱ्यांनी महामंडळाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचा परिणाम राज्यभर दिसला. 

संपामुळे... 

  • 80 आगारे पूर्णत: बंद. 
  • 145 आगारांमध्ये अंशत- वाहतूक सुरू. 
  • मराठवाडा आणि विदर्भात 50 टक्के वाहतूक सुरू 
  • 35 हजार 249 बस फेऱ्यांपैकी 24 हजार 842 फेऱ्या रद्द. 
  • संपाचे परिणाम मुख्यत्वे मुंबई विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात. 

संघटनांकडून दक्षता 
एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी ऑक्‍टोबर 2017 मध्ये पुकारलेला संप मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवला होता. न्यायालयाच्या निर्देशानुसार संप पुकारण्यापूर्वी 45 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. त्यामुळे संपाबाबत दक्षता घेण्यात येत असून, संपाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणतीच संघटना पुढे आली नाही. 

संबंधित बातम्या

Saam TV Live