एसटीची अघोषित संपाची हाक; प्रवाशांचे हाल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

एसटी कर्मचाऱ्यांनी अघोषित संपाची हाक दिली असून मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेलेत. संपाची नोटीस देणं शक्य नसल्यानं कामगार संघटनांनी गोपनयरीत्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावरुन संपाचं आवाहन केलंय. सरकारने मोठा गाजावाजा करत फुगीर आकडा दाखवत फसवी पगारवाढ केली असल्याचा संघटनांचा एसटी आरोप आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये या वेतनवाढीबद्दल कमालीची नाराजी आहे.

केवळ 20 एसटी रवाना
​ठाण्यातही एसटीचा संप सुरू आहे. ठाण्यातल्या खोपट आणि वंदना आगारातून रोज 200एसटी रवाना होतात. मात्र रात्री 12 वाजल्यापासून केवळ 20 एसटी रवाना झाल्यात. वसई, पालघर, विरार या ठिकाणी जाणा-या एसटी संपूर्णपणे बंद आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आगारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

गणेशपेठ बस स्थानकात अर्ध्यापेक्षा जास्त बसेस ठप्प
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका प्रवाशांना बसतोय. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे नागपूरातील गणेशपेठ बस स्थानकात अर्ध्यापेक्षा ज्यास्त बसेस ठप्प आहेत..त्यामुळे प्रवासी बस आगारात ताटकळत बसून आहेत. या संपामुळे गोंदियाभंडाऱ्यातही एसटीमुळे प्रवाशांचे हाल होतायत. 

सांगलीत एसटीच्या संपाचा मोठा फटका
सांगलीत एसटीच्या संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय. सांगलीत मध्यरात्रीपासून एसटीचा संप सुरु आहे. वेतनवाढीवरुन असलेल्या नाराजीमुळे कर्मचाऱ्यांनी आज अघोषित संप पुकारलाय. ज्याचा फटका सांगलीतील प्रवाशांना बसल्याचं पाहायला मिळतंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live