पुणे: बुधवार पेठेत दहिहंडीदरम्यान स्टेज कोसळून 12 जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पुणे : दहीहंडीच्या उत्सवादरम्यान बुधवार पेठ परिसरातील एका मंडळाचा स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ विजय शिवाजी तरुण मंडळ आहे. या मंडळच्या दहीहंडी बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी स्टेज कोसळले. त्यामध्ये 10-12 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली.

या दुर्घटनेनंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. क्षमतेपेक्षा जास्त जण स्टेजवर आल्याने स्टेज कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: stage collapse during DahiHandi in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live