डिसेंबरमध्ये 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

देशात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेणं शक्य नसल्याचा खुलासा, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ओ. पी. रावत यांनी केला असला. तरी डिसेंबरमध्ये चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जाऊ शकतात, असं रावत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात डिसेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

प्रसार माध्यमांशी बोलताना ओ. पी. रावत यांनी हा खुलासा केला. 'जर मुदतीपूर्वीच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होत असतील तर राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकाही डिसेंबरमध्येच एकत्र घेतल्या जातील. त्यासाठी निवडणूक आयोग तयार आहे', असं रावत यांनी स्पष्ट केलं

संबंधित बातम्या

Saam TV Live