राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबई :  अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या विस्ताराला मुहूर्त मिळाल्याची चर्चा असून येत्या शनिवारी म्हणजेच 13 ऑक्‍टोबरला राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असून विधानभवनात हा कार्यक्रम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होत आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या 25 कॅबिनेट आणि 16 राज्यमंत्री आहेत. त्यात शिवसेनेच्या पाच कॅबिनेट तर सात कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही भरायची आहे. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीच्या तीन जागा भरायच्या आहेत. 

राज्यातील फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही अपेक्षित आहेत. अशावेळी मंत्रिमंडळाचा हा संभाव्य विस्तार व खांदेपालट अखेरचा ठरण्याची शक्‍यता आहे. रविवारीच मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केल्याचे कळते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. फडणवीस यांच्या कारर्कीर्दीत आतापर्यंत तीन वेळा मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. दोन वर्षांनंतर ही बैठक होत आहेत. एरव्ही दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होते. मात्र, यात राज्यमंत्र्यांचा समावेश नसतो. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यामुळे उद्याच्या या बैठकीला महत्त्व आले आहे.

WebTitle : marathi news state government cabinet expansion on saturday

संबंधित बातम्या

Saam TV Live