गृहनिर्माण धोरणात लवकरच बदल होण्याची शक्यता; एका व्यक्तीला मिळणार एकच घर 

गृहनिर्माण धोरणात लवकरच बदल होण्याची शक्यता; एका व्यक्तीला मिळणार एकच घर 

स्वप्ननगरी मुंबईत आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि याच स्वप्नासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक दिवसरात्र झटत असतात. म्हाडा, सिडको किंवा इतर अनेक योजनांमधून घर घेण्याची संधीही मिळते. पण याचा बरेच जण गैरफायदा घेतायेत. एक व्यक्ती इतर योजनांमधूनही लाभार्थी होत बरेच गरजवंत मुंबईत घर घेण्यापासून वंचित राहातायेत. यासाठी आता गृहनिर्माण धोरणात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. नव्या धोरणानुसार एका व्यक्तीला एकच घर मिळू शकेल.

गृहनिर्माण धोरणात बदल होऊन नवा नियम अस्तित्वात आला तर तुम्हाला सरकारी योजनेतून एक आणि एकच घर मिळेल. उदाहारण द्यायचं झाल्यास समजा तुम्ही मुंबईत  म्हाडाच्या सोडतीतून घर मिळवलं असेल आणि भविष्यात तुम्हाला पुणे किंवा नवी मुंबईतल्या सोडतीसाठीही अर्ज करायचा असेल तर तो अर्ज करता येणार नाही. 

आतापर्यंत अनेकांनी म्हाडाच्या योजनेत घर मिळाल्यानंतर इतर सोडतीत अर्ज केले आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या नावे एकापेक्षा जास्त घरं आहेत. अर्थात असं असलं तरी या नव्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहेत. कारण एखाद्या व्यक्तीला एका योजनेतून एखाद्या  शहरात किंवा जिल्ह्यात घर मिळालं तरी दुसऱ्या भागातही  त्याला घराची आवश्यकता असू शकते, असा युक्तिवादही केला जाऊ शकतो. 

WebTitle : marathi news state government to redesign the housing policy of mhada and cidco

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com