आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार...

साम टीव्ही
शुक्रवार, 29 मे 2020

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार असून त्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार असून त्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. सरकारने राज्यांतील जनतेसाठी पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विरोधक सातत्याने करतायत. त्याबाबत छेडलं असता अजित पवार म्हणाले की, "गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभं राहिलंय.

त्यावर आपल्याला मार्ग काढायचा असून राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याचंही ते म्हणाले.  मध्यंतरी केंद्रांने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत साशंकता आहे. नुसतेच मोठे आकडे नकोत, तर गरीब जनतेला मदत मिळायला हवी, असा टोलाही त्यांनी हाणला. 

लॉकडाऊननंतर 1 जूनपासून पुढे काय करायचं याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांमध्ये चर्चा झालीय. त्या अगोदर गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यामध्ये गोव्य़ासह अनेक राज्यांनी आणखी लॉकडाऊनचा कालावधी 15 दिवसांनी वाढविण्याची मागणी केली.

केंद्र सरकार आणि राज्यांची सरकारे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणासह अर्थव्यव्यवस्थेबाबतही चिंतेत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना, तर दुसरीकडे गेले दोन महिने बंद असलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. ही बाब पाहता केंद्राच्या निर्णयाकडे सर्वच राज्यांचं लक्ष लागलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live