उरलेली मंत्रिपद कुणाकडे?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 डिसेंबर 2019

तिन्ही पक्षांतील नाराजांना गाजर दाखविण्यासाठी किमान दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काही मंत्रिपदे रिक्‍त ठेवण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडील दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे रिक्‍त ठेवण्यात येतील; तर काँग्रेसच्या कोट्यातील एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे रिक्‍त ठेवण्यात येणार आहेत.

संभाव्य मंत्रिपदे
कॅबिनेट          राज्यमंत्री
शिवसेना
   १२                  ४ 
राष्ट्रवादी काँग्रेस 
  ११                  ४
काँग्रेस 
   ८                   ४

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या वेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून, त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल.

Marathi News ::  state mantrimandal expansion after 23rd december politics


संबंधित बातम्या

Saam TV Live