राज्यमंत्री संजय राठोड आदित्य ठाकरेंच्या पाया पडले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मार्च 2019

नागपूर : भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आज यवतमाळला आले होते. त्यांचे स्वागत करताना आदित्य कारमधून उतरताच राज्यमंत्री संजय राठोड त्यांच्या पाया पडले. याची व्हिडीओ क्‍लीप समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाली. आज दिवसभर त्याच्या उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

लहानांनी मोठ्यांच्या पाया पडून नमस्कार करायचा असतो, सामान्यपणे अशीच परंपरा, संस्कृती आहे. पण आज राज्यमंत्री रा'ठोड यांनी या परंपरेला छेद दिला. आदित्य जरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र, पक्षाचे राज्यस्तरीय नेते आहेत. तरी संजय राठोड यांच्यापेक्षा ते वयाने कितीतरी लहान आहेत. खरच त्यांनी पाया पडणे योग्य होते का, असा प्रश्‍न लोक एकमेकांना विचारत होते. 

यानिमित्ताने  औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांचाच पॅटर्न राठोड यांनी राबवला असल्याची चर्चा कार्यकर्त्यात होती .  राठोड जिल्यातील अनेक कार्यकर्त्यांचे आदर्श आहेत, ही कृती करुन त्यांनी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना नेमका कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला, हे कोडेही अनेकांना उलगडलेले नाही. खरे तर तेथे उपस्थितांनाही हा प्रकार आवडला नसल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live