एसटी कर्मचाऱ्यांना आता ६ महिन्यांची बालसंगोपन रजा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई - मुलांच्या संगोपनासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. महिला कर्मचाऱ्यांबरोबरच पत्नी हयात नसलेले कर्मचारी; तसेच पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली असलेल्या कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल.

महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करीत असताना महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा मुलांकडे लक्ष देणे शक्‍य होत नाही. विशेषत: परीक्षांच्या काळात मुलांना पालकांची अधिक गरज असते. या बाबी लक्षात घेत महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live