एसटीच्या तिकीट दरांमध्ये 18 टक्के वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

महत्त्वाची बातमी एसटी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी. आजपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये 18 टक्के वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली असून या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे.

यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या दरवाढीमुळे शिवनेरीच्या तिकीटदरात भरमसाठी वाढ झाली आहे. नुकतीच सुरु झालेली शिवशाहीसुद्धा आवाक्याबाहेर जात आहे. तर साध्या गाडीच्या दरातही घसघशीत वाढ झाली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live