गणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय

गणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय

गणपती उत्सवासाठी एसटी सज्ज झालीय एसटीनं कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय केलीय. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत ही बस सेवा असेल. विशेष म्हणजे, यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे. तर २० जुलैपासून ग्रुप बुकींगला सुरूवात होणार आहे. मुंबई, उपनगरातील 14 ठिकाणाहून या जादा बसेस सुटणार आहेत

२० जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात. ही बस त्यांना सोयीची ठरते. गेली कित्येक वर्ष एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) २० जुलै पासून सुरुवात होत आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

मुंबई आणि उपनगरातील १४ ठिकाणाहून जादा बसेस सुटणार..

२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा  बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके  (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.

WebTitle : marathi news state transport to run 2200 extra buses for the people who travel to konkan for ganeshotsav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com