72 तास सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे भारतीय निवडणुक आयोगाचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

लोकसभा 2019 
हिंगोली : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असून आगामी 72 तास सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश भारतीय निवडणुक आयोगाने सोमवारी (ता. 15) सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिल्या आहेत. 

लोकसभा 2019 
हिंगोली : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असून आगामी 72 तास सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश भारतीय निवडणुक आयोगाने सोमवारी (ता. 15) सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिल्या आहेत. 

देशात महाराष्ट्रातील दहा जागांसह विविध राज्‍यांमध्ये दुसऱ्या टप्‍प्‍यात गुरुवारी (ता. 18) मतदान होणार आहे. आगामी 72 तासात निरीक्षकांनी कुठल्‍या उपाय योजना हाती घ्याव्यात या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी (ता. 15) सकाळी निवडणूक निरीक्षकांची व्‍हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यामध्ये निवडणुकीसाठी बाहेरराज्‍यातून पाठवण्यात आलेल्‍या खर्च निरीक्षक, सर्वसाधारण निरीक्षक, पोलिस यंत्रणा निरीक्षक यांची उपस्‍थिती होती.

भारतीय निवडणुक आयोगाने दिलेल्या प्रमुख सूचना : 

  • आगामी 72 तासात तपासणी नाके सज्‍ज ठेवावेत.
  • या तपासणी नाक्‍यांवर प्रत्‍येक वाहनांची तपासणी करावी.
  • खर्च निरीक्षकांनी वेळोवेळी या नाक्‍यांवर भेटी देवून पाहणी करावी.
  • भरारी पथके सज्‍ज ठेवून संशयीत वाहनांची तपासणी करावी.
  • उमेदवारांच्या खर्चाची वेळोवेळी तपासणी करावी
  • सर्वसाधारण निरीक्षकांनी मतदान यंत्रांची खातरजमा करावी.
  • मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी काय उपाय योजना केली याची माहिती घ्यावी.

    तसेच मतदान झाल्‍यानंतर मतदान यंत्र ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्‍या स्‍ट्राँग रुमची वेळोवेळी तपासणी करण्याच्‍या सूचना आयोगाने दिल्‍या आहेत. मतदान केंद्रावरील आवश्यक सुविधांची पाहणी करून ज्‍या ठिकाणी सुविधा नसेल त्‍या ठिकाणी सुविधा उपलब्‍ध करून देण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवण्याच्‍या सूचना देण्यात आल्‍या आहेत. पोलिस यंत्रणा निरीक्षकांनी आपापल्‍या जिल्‍ह्‍यातील कायदा व सुव्यवस्‍थेबाबत पाहणी करावी. आवश्यक असलेल्‍या भागातील बंदोबस्‍त, तसेच बाहेर राज्‍यातून मागवण्यात आलेल्‍या बंदोबस्‍ताच्‍या नियोजनाची माहिती घेण्याची सूचना दिली आहे.

 

Web Title:  MARATHI NEWS Stay alert for 72 hours Notice of Election Commission of India


संबंधित बातम्या

Saam TV Live