...यामुळे अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम थांबवलं

साम टीव्ही
शुक्रवार, 19 जून 2020

भारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या वादाचा फटका राम मंदिराच्या निर्माण कार्याला बसलाय. सीमेवरची परिस्थिती सुधारेपर्यंत बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या काही दिवसात राम मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात येणार होतं. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे काम थांबवण्यात आलंय.

अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टनं एक अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. भारत आणि चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर  अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम थांबवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतलाय. भारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या वादाचा फटका राम मंदिराच्या निर्माण कार्याला बसलाय. सीमेवरची परिस्थिती सुधारेपर्यंत बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या काही दिवसात राम मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात येणार होतं. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे काम थांबवण्यात आलंय.

भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलीय.  आज ही बैठक पार पडणार आहे. चीनबरोबर सुरू असलेल्या वादावर सर्वपक्षीय नेत्यांची काय मतं आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलीय. संध्याकाळी पाच वाजता सर्व पक्षांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी होणार आहेत. या विषयावर विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची सतत मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय. लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहचलाय. हा तणाव मुत्सद्देगिरीच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 

एकीकडे चीनसोबत भारताचे संबंध ताणलेले असताना. दुसरीकडे पाकिस्तानच्याही कुरापती सुरूच आहेत. जम्मूत रोजच दहशतवाद्यांशी चकमकीच्या बातम्या येतायत. अशात आजही जम्मूत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांशी चकमकी झाल्यात.. या दोन्ही एन्काऊंटरमध्ये जम्मूत 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला आणि जम्मू पोलिसांना यश आलंय. शोपियानच्या मुनंद इथं दहशतवादी आणि सैन्यात चकमक झाली. या ठिकाणी 5 दशतवाद्याचा खात्मा करण्यात सैन्याला यश आलाय. तर पंपोर इथल्या एका मशिदीत लपून बसलेल्या 3 दहशतवाद्यांनाही ठार केलं गेलंय. दरम्यान,  पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सकाळी पावणे आकराच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर छोटी शस्त्रं आणि मोर्टारवरुन गोळीबार करण्यात आला.  भारतीय सैन्यानंही याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live