पर्रिकर आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबाबतचा विचित्र योगायोग

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 मार्च 2019

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल (ता. 17) निधन झाले. मागील वर्षभर त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. यावेळी एक विचित्र योगायोग समोर आला, तो असा की, त्यांच्या पत्नीचेही 2001 मध्ये कर्करोगानेच निधन झाले होते. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रीकर यांनाही कर्करोग झाला होता व आता मनोहर पर्रीकरांचेही कर्करोगाने निधन झाले. यावेळी या प्रसंगाची आठवण झाली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे फेब्रुवारी 2018 मध्ये उघडकीस आले. त्यानंतर त्यांना सुरवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात व नंतर अमेरिकेत उपचारांसाठी नेण्यात आले होते. तेथून उपचार घेऊन ते गोव्यात परतले होते. दोन महिन्यांपूर्वी 27 जानेवारी रोजी मांडवी नदीवरील नव्या पुलाच्या, "अटल सेतू'च्या उद्‌घाटनालाही ते नाकाला नळी लावलेल्या स्थितीत उपस्थित होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी उरी चित्रपटातील "हाऊ इज द जोश?' हा प्रश्‍न विचारला. त्याला विद्यार्थ्यांनीही "हाय सर' असे उत्स्फूर्त उत्तर दिले होते.  

Web Title: marathi news strange coincident of maohar parrikars and his wife's sad demise 

संबंधित बातम्या

Saam TV Live