संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी संपात सहभागी होणाऱ्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तीन दिवसीय संपात सहभागी होणं गैरवर्तन समजून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

विभागप्रमुख आणिकार्यालय प्रमुखांना राज्य सरकारने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसंच कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रजा मंजूर करु नये आणि रजेवर असलेल्या प्रकरणांचा विचार करत रजा रद्द करुन कामावर रुजू होण्याचे निर्देश द्यावेत, असंही शासनाने परिपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी 3 दिवसीय दिवसीय संपावर आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयात शुकशुकाटाचं वातावरण आहे. 

WebTitle : marathi news strike for seventh pay commission action by state government 

संबंधित बातम्या

Saam TV Live