BIG BREAKING | वांद्रे स्टेशनवर परप्रांतियांची तुफान गर्दी

साम टीव्ही
मंगळवार, 19 मे 2020

वांद्रे स्टेशन परिसरात हजारो परप्रांतीयांनी सकाळच्या सुमारास तुफान गर्दी केली होती.

मुंबई : वांद्रे स्टेशन परिसरात हजारो परप्रांतीयांनी सकाळच्या सुमारास तुफान गर्दी केली होती. हजारोच्या संख्येने परप्रांतीय स्टेशन परिसरात आले होते. परराज्यात ट्रेन जाणार असल्याच्या माहितीने सगळेजण आले. मात्र, स्टेशन परिसरात तुफान गर्दी झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत गर्दीवर नियंत्रण आणलं.

पाहा त्या गर्दीचे एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ-

गेल्या काही दिवसांपूर्वीही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. टेका अफवेमुळे लाखोंच्या संख्येने मजूर वांद्रे स्टेशनवर पोहचले होते. आणि आता पु्न्हा हीच परिस्थिती. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली. कोरोनाच्या भीतीने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन सगळीकडून केलं जात असतानाच असे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजताना पाहायला मिळतायत.


संबंधित बातम्या

Saam TV Live