महाविकास आघडीचं स्टेअरिंग कुणाकडे? अजितदादांच्या बर्थडे विशनंतर जोरदार चर्चा

साम टीव्ही
सोमवार, 27 जुलै 2020

महाविकास आघडीचं स्टेअरिंग कुणाकडे? 
स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात? की पवारांच्या
अजितदादांच्या बर्थडे विशनंतर जोरदार चर्चा

तीन चाकी महाविकास आघाडीचं स्टेअरिंग नेमकं कुणाकडे आहे? मुख्यमंत्र्यांनी जरी स्टेअरिंग आपल्याकडेच असल्याचं म्हटलं असलं, तरीही हा प्रश्न आता नव्याने चर्चेत आलाय. त्याला निमित्त ठरलंय. ते अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोचं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एक विधान केलं. महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचं ते म्हणाले,

उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचीही बरीच चर्चा झाली. मात्र यानंतर लगेचच त्यांच्या वाढिदिवशी अजितदादांनी एक फोटो शेअर केला. आणि न बोलताच जे बोलोयचं होतं, ते बोलून गेले. 

हा आहे, दादांनी शेअर केलेला फोटो.. त्यात स्टेअरिंग पवारांच्याच हातात दिसतंय. त्यामुळे अर्थातच उलट सुलट राजकीय चर्चा सुरु झाल्या आणि लगेचच यावर संजय राऊतांचीही प्रतिक्रिया आली. 

आता खरंच गाड्या कोण पुरवतं. आणि स्टेअरिंग कुणाच्या हातात आहे.. हे ठाकरे आणि पवारांनाच ठाऊक पण अजितदादांनी आपल्या या बर्थ डे विशनं नवे राजकीय तर्कवितर्क लढवण्यास आयती संधी दिलेय. इतकं मात्र नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live