अपघातात बारावीचा विद्यार्थी ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

सांगली ः येथील कवठेपिरान सांगली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बारावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. अतुल संजय पाटील (वय 18, रा. कवठेपिरान) असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आज सकाळी कवठेपिरान रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळ हा अपघात झाला. दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अतुल पाटील हा बारावीत शिकतो आहे. बोर्डाच्या परिक्षा सुरू आहे. त्याचा एक पेपर अजून व्हायचा आहे. त्यासाठी त्याचा अभ्यास सुरू होता. आज सकाळी तो दुचाकीत पेट्रोल आणण्यासाठी गेला होता. पेट्रोल घेवून कवठेपिरान गावी दुचाकीवरून परतत होता. त्यावेळी भरधाव वाहनाने त्याला जोराची धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताबाबत समजताच परिसरातील लोक घटनास्थळी गोळा झाला. तोवर वाहनचालकाने पळ काढला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. 

Web Title  Student Killed In Accident

संबंधित बातम्या

Saam TV Live