आण्विक क्षमतेच्या अग्नि -1 ची यशस्वी चाचणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

बालासोर - अग्नि-1 या सातशे किमी पल्ला असलेल्या आण्विक क्षेपणास्त्राची भारताकडून आज (मंगळवार) यशस्वी चाचणी करण्यात आली.

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे अग्नि हे क्षेपणास्त्र भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते. ओडिशा किनारपट्टीजवळील अब्दुल कलाम बेटावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुमारे 12 टन वजन व 15 मीटर लांबी असलेल्या अग्नि क्षेपणास्त्राची 1 हजार किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live