निरूपम यांच्याविरोधात मुनगंटीवारांचा अब्रुनुकसानीचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

चंद्रपूर : "अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरुवार) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. 

यवतमाळ जिल्ह्यात "अवनी' वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले होते. अनेकांनी या प्रकरणात त्यांच्यावर आरोप केले. तसेच संजय निरूपम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वनमंत्री म्हणून मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झालेल्या वाघांच्या मृत्यूची यादीच दिली. याशिवाय आंतरराष्ट्रीय तस्करांसोबत त्यांचे सबंध असल्याचा खळबळजनक आरोपही केला. त्याचवेळी मुनगंटीवार यांनी निरूपम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असे सांगितले.

दरम्यान, आज मुनगंटीवार यांनी चंद्रपूर न्यायालयात त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल असून, याअंतर्गत दंड आणि शिक्षेची तरतूद आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live