औरंगाबाद आणि बारामतीत रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादेतील एका तरुणीनं आपलं आयुष्य संपवलंय. कन्नड तालूक्यातील तांदूळवाडी गावातल्या 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीला गावातली काही मुलं फोन करुन त्रास देत असल्याचा आरोप केला जातोय.

विशेष म्हणजे या तरुणीनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा याआधीही प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा तिला उपचारादरम्यान वाचवण्यात यश आलं होतं. मात्र पुन्हा एकदा या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न करत गळफास लावून घेतला. यामध्ये या तरुणीचा मृत्यू झालाय. 

दरम्यान, बारामतीमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करून अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या केलीय. ही विद्यार्थिनी अकरावीत शिकत होती. 

WebTitle : marathi news suicides due to eve teasing  maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live