सुजय विखे भाजपमध्ये आले.. 10 मिनिटांत उमेदवारीही मिळाली!

सुजय विखे भाजपमध्ये आले.. 10 मिनिटांत उमेदवारीही मिळाली!

मुंबई- सुजय विखे हे भाजपकचे नगरमधून उमेदवार असतील असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सुजय विखेंना घरात बंड करावा लागला याचा विचार व्हायला हवा, काही दिवसांनी घरच्यांनाही सुजय यांचा निर्णय योग्य वाटेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज (ता. 12) सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळी भाजपप्रणित युतीच्या केंद्रात 2014 पेक्षा जास्त जागा येतील, महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा येतील असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांचं नाव भाजपच्या संसदीय मंडळाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही पक्षाकडे सुजय विखेंचं नाव पाठवू, ते त्याला होकार देतील, नगरमधील जागा रेकॉर्ड मताने येईल. डॉ. सुजय विखेंनी कोणतीही अट घातली नाही, सुजय यांच्या रुपाने महाराष्ट्राला चांगलं नेतृत्त्व मिळू शकतं असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, भाजपच्या सर्व आमदारांशी चर्चा करुन सुजय विखेंना भाजपमध्ये प्रवेश दिला असल्याचे स्पष्टीकरणही  मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

Web Title:Sujay Vikhe Patils name has been forwarded by state unit to Central Parliamentary board say Devendra Fadnavis

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com