राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचे बंधू शिवसेना नेत्यांच्या संपर्कात 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्रातील भाऊबंदकीच्या राजकारणात नवी भर पडण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद आता जगजाहीर झाला आहे. 

नाराज असलेले अनिल तटकरे यांनी मातोश्रीवर नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र आमदार अवधूत तटकरे हेही होते. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यास अवधूत उत्सुक आहे असे मानले जाते.

प्रदेशाध्यक्ष पदावर असताना सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. 
सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे राजकारणात सक्रिय असून त्या आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही आहेत. तरुण पिढीतील उदयोन्मुख व्यक्‍तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तटकरे कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी या भेटीसंबंधी कोहीही बोलण्यास नकार दिला; मात्र शिवसेनेच्या संबंधित क्षेत्रातील संपर्कप्रमुखांनी या भेटीला दुजोरा दिला.

शिवसेनेतील एका उच्चपदस्थाने केवळ तटकरेच नव्हे, तर अन्य काही आमदारही आमच्या संपर्कात आहेत, अवधूत व अनिल तटकरे यांनी तयारी दाखवल्यास दसरा मेळाव्यात प्रवेशाची घोषणा होणार काय, असा प्रश्‍न केला जातो आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live