सनी लिओनच्या घरी दोन चिमुकल्यांचे स्वागत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 मार्च 2018

अभिनेत्री सनी लिओन व पती डॅनिअल वेबर आता जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती. आता या दाम्पत्याला सरोगसीद्वारे जुळी मुले झाली आहेत. 

इन्स्टाग्रामद्वारे सनीने ही गोड बातमी शेअर केली. मुलगी निशा कौर वेबर आणि जुळी मुलं अशर कौर वेबर, नोह कौर वेबर यांच्यासह माझे कुटूंब पूर्ण झाले अशी भावना तिने व्यक्त केली.

देवाच्या विशेष देणगीमुळे आम्ही कमी वेळातच तीन गोड मुलांचे पालक झालो आहोत. आपलं एक छान कुटूंब असावं असं मला नेहमी वाटायचं. त्याप्रमाणे इतक्या वर्षानंतर या तीन मुलांमुळे आमचे कुटूंब आता परिपूर्ण झाले आहे. या मुलांचा जन्म काही आठवड्यांपूर्वीच झाला आहे, पण आमच्या मनात ते अनेक वर्षांपूर्वीपासून होते. सरोगसीचा पर्याय आम्ही काही वर्षांपूर्वीच निवडला होता. त्याप्रमाणे आता आम्ही जुळ्या मुलांचे पालक आहोत व अत्यंत आनंदी आहोत, अशी भावना सनीने इन्स्टाग्रामद्वारे व्यक्त केली. 

2017 च्या जुलै महिन्यातच सनी व तिचे पती डॅनिअल यांनी महाराष्ट्रातील लातुर जिल्ह्यातील निशा या चिमुकलीला दत्तक घेतले होते.  

संबंधित बातम्या

Saam TV Live