अभिनेता वैभव मांगलेंना अलबत्या गलबत्या नाटक दरम्यान उष्म्यामुळे भोवळ; प्रकृती स्थिर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

सांगली : प्रसिद्ध नाट्यचित्रपट अभिनेते वैभव मांगले शुक्रवारी 'अलबत्या गलबत्या' या नाटकाचा प्रयोग करत असताना रंगमंचावरच कोसळले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने संयोजकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. सांगलीत भावे नाट्यगृहात शुक्रवारी रात्री हा प्रसंग ओढवला. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

सांगलीत विष्णुदास भावे नाट्यगृहात आज दुपारी चार वाजता मांगले यांच्या गाजलेल्या "अलबत्या गलबत्या' या नाटकाचा प्रयोग होता. त्यासाठी ते दुपारी नाट्यगृहात आले. रात्री साडेसातच्या सुमारास नाटक संपण्यास पंधरा मिनिटे शिल्लक असताना मांगले अचानक रंगमंचावरच कोसळले. काय झाले हे प्रेक्षकांना समजलेच नाही. सहकलाकार व संयोजकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तत्पूर्वी नाट्यगृहात उद्‌घोषणा करून प्रेक्षकांना घटनेची माहिती देण्यात आली. आज रात्री पलूसमध्ये याच नाटकाचा आणखी एक शो होता; तो रद्द केल्याची माहिती संयोजक मारुती गायकवाड यांनी "सकाळ'ला दिली. 

मांगले यांना उष्माघातासारखा त्रास झाला आहे, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कारण नाही, मात्र त्यांना 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली. 

Web Title: Marathi News sunstroke hit actor Vaibhav Mangle in Sangli

संबंधित बातम्या

Saam TV Live