विराट कोहलीच्या चाहत्या चारुलता पटेल यांचे निधन

विराट कोहलीच्या चाहत्या चारुलता पटेल यांचे निधन

मुंबई : आयसीसी वर्ल्डकप 2019 मध्ये पिपाणी वाजवून टीम इंडियाला पाठिंबा देत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या टीम इंडियाच्या सुपरफॅन चारूलता पटेल यांचे निधन झाले. चारूलता पटेल या 87 वर्षीय होत्या. 

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप 2019 मध्ये भारताविरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात 87 वर्षीय चारुलता पटेल यांनी मैदानात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी टीम इंडियाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने स्वत: सुपरफॅन चारूलता यांची भेट घेतली होती. 

सर्वांचे लक्ष घेतले होते वेधून

जुलै 2019 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात चारुलता पटेल यांनी भारताला पाठिंबा देत तिरंगा स्कार्फसह पिपाणी वाजवली होती. त्यामुळे त्यांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. 

टान्झानियात जन्म

चारुलता पटेल यांचा जन्म टान्झानिया देशात झाला असून, त्यांचे आईवडील भारतीय होते. त्यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. तसेच त्यांना क्रिकेट खेळायला आवडत होते.

20 वर्षांपासून पाहत होत्या क्रिकेट

गेल्या 20 वर्षांपासून चारूलता पटेल या क्रिकेट पाहत होत्या. क्रिकेटला मी माझ्या मुलांप्रमाणेच मानते, असे चारुलता पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Web Title superfan charulata patel passes away

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com