आवडती मॅगी पुन्हा होणार बंद ?  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

मॅगी म्हंटलं की तुमच्या आमच्या तोंडाला पाणी सुटतं अवघ्या 2 मिनिटांत तयार होणारी मॅगी म्हणजे लहानग्यांचा जीव की प्राण. मुलं दंगा करू लागली की अनेक महिला आपल्या मुलांना मॅगी देऊन त्यांचा राग शांत करतात. पण हीच मॅगी पुन्हा अडचणीत आलीय.

कारण,  यावेळी एफडीएनं नव्हे तर कोर्टानेच मॅगीच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह लावलंय.  नेस्ले कंपनीकडून सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी सुरु झालीय. त्यावर लहान मुलांना शिसेयुक्त मॅगी का खायला द्यावी? असा सवाल कोर्टानं कंपनीला विचारलाय.  त्यामुळे मुलांना मॅगी द्यायची की नाही असा सवाल पालकांनाही पडलाय. 

मॅगीमध्ये जास्त प्रमाणात शिसं आणि मोनो सोडियम ग्लुटामेट सापडल्याप्रकरणी केंद्र सरकारनं तीन वर्षांपूर्वी नेस्ले कंपनीकडून  640 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. नेस्लेकडून या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. यावर सुनावणी करतांना कोर्टानं मॅगीचं उप्तादन करणाऱ्या कंपनीला चांगलंच खडसावलंय. त्यामुळे मॅगीचं काय होणार याची उत्सुकता मोठ्यांसह बच्चेकंपनीलाही लागलीय. 

Web Title : marathi news supreme court might put ban on famous fast food maggi 

संबंधित बातम्या

Saam TV Live