ऍट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 एप्रिल 2018

ऍट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. केंद्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर आता १० दिवसांनी सुनावणी होणार आहे. ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी दुपारी 2 वाजता सुनावणी झाली. यावेळी ‘आम्ही या कायद्याविरोधात नाही. मात्र, यामुळे निरपराधांना शिक्षा व्हायला नको, असं मत कोर्टानं व्यक्त करत आपल्या निर्णयाला स्थिगिती देण्यास नकार दिला. त्याचबरोबर या प्रकरणी जे पक्षकार आहेत त्यांनी तीन दिवसांत आपली बाजू मांडण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.

ऍट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. केंद्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर आता १० दिवसांनी सुनावणी होणार आहे. ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी दुपारी 2 वाजता सुनावणी झाली. यावेळी ‘आम्ही या कायद्याविरोधात नाही. मात्र, यामुळे निरपराधांना शिक्षा व्हायला नको, असं मत कोर्टानं व्यक्त करत आपल्या निर्णयाला स्थिगिती देण्यास नकार दिला. त्याचबरोबर या प्रकरणी जे पक्षकार आहेत त्यांनी तीन दिवसांत आपली बाजू मांडण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानंतर दहा दिवसांनी अर्थात 11 एप्रिल रोजी यावर पुढील सुनावणी होईल असेही कोर्टाने स्पष्ट केलंय. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आपण या निर्णयाबाबत पूर्णपणे सहमत नसल्याचं म्हंटलंय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live