...ताजमहाल बंद करा; सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले महत्वपूर्ण मत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

जगातील सात आर्श्चयांपैकी एक असलेल्या ताजमहालबाबत आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मत नोंदविले. न्यायालयाने सांगितले, की ताजमहाल बंद करा, त्याला नष्ट करा किंवा त्याची योग्यप्रकारे देखभाल करा, असे सर्वोच्च न्यायालाने केंद्र सरकारला सांगितले.

ताजमहालची योग्यरितीने देखभाल करण्यात यावी, अशी विचारणा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने सांगितले, की आयफिल टॉवरपेक्षा ताजमहाल खूप सुंदर आहे. परराष्ट्र व्यवहार सुधारण्यास ताजमहाल मदत करू शकेल. ताजमहाल 16 व्या शतकात बांधण्यात आला असून, त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

शाह जहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहालची बांधणी केली. आयफिय टॉवर हेदेखील युरोपातील जगातील सुंदर वास्तूंपैकी एक आहे. सुमारे 8 कोटी पर्यटक टीव्ही टॉवरसारखे दिसणाऱ्या आयफिल टॉवर पाहण्यासाठी येत आहेत. मात्र, या आयफिल टॉवरपेक्षा ताजमहाल अत्यंत सुंदर आहे, असेही न्यायालयाने सांगितले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live